Noida Shocker: विवाहबाह्य संबंधांचा संशय; पतीने इंस्टाग्राम वापरण्यास रोखल्याने गळफास घेत पत्नीची आत्महत्या

विवाहबाह्य संबंधांचा संशयामुळे पतीने इन्स्टाग्राम वापरण्यास नकार दिल्याने पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

Noida Shocker: विवाहबाह्य संबंधांचा संशय; पतीने इंस्टाग्राम वापरण्यास रोखल्याने गळफास घेत पत्नीची आत्महत्या
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Noida Shocker: क्षुल्लक कारणावरून एक महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नोएडा(Noida)मधून समोर आली आहे. पतीने इन्स्टाग्राम (Instagram)वापरण्यास नकार दिल्याने सदरपूर येथील एका महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Wife Commits Suicide) केली. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत महिलेकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. आत्महत्येमागील इतर कारणांचा पोलीस तपास करत आहेत. (हेही वाचा: Bengaluru: संतापजनक! 5 महिन्यांच्या बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला मद्यधुंद दुचाकीस्वाराकडून मारहाण (Watch Video))

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा तिच्या पती आणि दोन मुलांसोबत सदरपूर कॉलनीत राहत होती. सोमवारी सकाळी विशाखा हिचा पतीसोबत इन्स्टाग्राम वापरण्यावरून वाद झाला. या वादात पतीकडून आर्वाच्य भाषेत शिवीगाळही झाला. त्यामुळे दुखावलेल्या विशाखा यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील नागरिकांनी सांगितले की, मृत महिलेने सहा महिन्यांपूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विशाखा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाशी तरी बोलत असल्याचा पतीला संशय होता.

यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद झाले. दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. महिलेच्या आत्महत्येची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे पोलिस बोलत आहेत. विशाखा ही गृहिणी होती, तर तिचा नवरा ओला बाईक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2024 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).