नालासोपारा: पतीची हत्या करुन आत्महत्या केल्याचे भासवणाऱ्या महिलेला अटक!
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून एका महिलेने पतीचा झोपेतच खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना नालासोपारा येथील परिसरात घडली आहे. महिलेने सुरुवातीला पतीने आत्महत्या केल्याचे बनाव केला. मात्र, पोलीस चौकशीत आपणच पतीचा खून केल्याची कबुली या महिलेने दिली.

सुनील कदम असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सुनील हा पत्नी प्रणाली आणि वडीलांसोबत नालासोपारा येथे राहत होता. परंतु सुनील याचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्यामुळे सुनील आणि प्रणाली यांच्यात वारंवार वाद होत असे. माहितीनुसार, बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास यांच्याच याच कारणांवरुन पुन्हा वाद झाला. त्यानंतर सुनील हा झोपायला गेला. संतापलेल्या अवस्थेत प्रणाली हिने सुनीलचा खून करायचे ठरवले. प्यायला पाणी आणण्याचे नाटक करुन प्रणालीने स्वंयपाक घरातून धारदार सुरी आणली. सुनील झोपल्याची तिने खात्री करुन घेतल्यानंतर प्रणालीने कोणताही विचार न करता सुनीलच्या पोटावर ११ वार करुन त्याचा गळाही चिरला. त्यानंतर सुनीलने आत्महत्या केल्याचा कांगावा तिने सासऱ्यापुढे केला.  हे देखील  वाचा-मुंबई: आपल्या 30 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरचा खून केल्याप्रकरणी 20 वर्षीय युवकाला अटक; व्यभिचाराच्या संशयामधून हे कृत्य घडल्याचा संशय

पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, प्रणालीनं ११ वार करुन त्याचा गळाही चिरला. खोलीतून बाहेर आल्यानंतर सुनील यांनी आत्महत्या केल्याचे सासऱ्यांना भासवून दिले. सुनील यांच्या वडिलांनी तुळींज पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यावेळी पतीची हत्या केल्याची कबुली प्रणालीने पोलिस चौकशीत दिली. पतीचे विवाहबाह्य संबंध होते म्हणूनच सुड घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचे प्रणालीने कबूल केले.