Firing | (Photo Credits: Pixabay)

Muzaffarpur Murder Caught on Camera: बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूरमध्ये एक मोठी घडली आहे. येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हल्लेखोरांनी एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदवारा अली मिर्झा रोडवर (Chandwara Ali Mirza Road) घडली. धक्कादायक म्हणजे गुन्हेगारांनी महिलेला तिच्या घरासमोर गोळ्या घातल्या. मिळालेल्या माहितीनुसार, दोन गुन्हेगार दुचाकीवरून आले होते आणि त्यांच्यावर गोळी झाडून पळून गेले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला.

संजीदा अमरीन असे मृत महिलेचे नाव असून ती अली मिर्झा रोड येथील रहिवासी आहे. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, महिला तिच्या घरासमोर असताना दोन दुचाकीस्वार तरुण तेथे आला. ज्यामध्ये एकाने हेल्मेट तर दुसऱ्याने मास्क घातले होते. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता. घटना घडली तेव्हा संजीदा जीममध्ये व्यायाम करुन परतत होती. याच वेळी महिलेसोबत ही घनटा घडली. प्राप्त माहितीनुसार, संजीदाचा पती मोहम्मद हुसेन हा सध्या दुबईत राहतो.

प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले की, दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाच्या हातात पिस्तूल होते. त्याने ते महिलेच्या कपाळावर रोखले आणि गोळी झाडली. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हल्लेखोराला विरोध केला. मात्र, हल्लेखोराने त्याच्यावरही गोळीबार केला. मात्र, त्याला गोळी लागली नाही. महिलेच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. घटनेनंतर शहरातील अनेक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शहराचे एसपी अरविंद प्रताप सिंग आणि एएसपी अवधेश दीक्षितही घटनास्थळी पोहोचले.

ट्विट

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी एसकेएमसीएचमध्ये पाठवला आहे. सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हत्येमागील कारणांचा सध्या पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी त्वरीत जमाव जमला आणि पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये आधीच उलगडलेल्या गोंधळात भर पडली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) आणि शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी तातडीने दाखल झाले.