 
                                                                 पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रकरण (Pune Crime) फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रामुख्याने तरुणांचा गुन्हेगारीकडे वाढता कल पाहता पुणे पोलिसांची चिंता वाढली आहे. तरुणांकडून अरेरावी आणि थेट गोळीबारांच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यातच आता बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना चुकून झाडल्या गेल्या आणि यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली. या प्रकरणी अभय छबन वाईकर, अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai: मुंबई झोपडपट्टीत 20 वर्षीय महिलेची आत्महत्या, राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह)
अभय आणि अविष्कार हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अभय याने दहशत माजविण्यासाठी बेकायदेशीर एक पिस्तूल खरेदी केलेले होते. हे पिस्तूल त्याने अविष्कार याच्याकडे हाताळण्याकरता दिले होते. यावेळी अविष्कार याने हलगर्जीपणाने हाताळल्याने पिस्तुल हाताळली आणि गमतीत त्याच्या हातून गोळी झाडली गेली. ही गोळी अभयच्या मानेला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. अभयला दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसापुर्वीच पुण्यातील खडकवासला धरणाच्या परिसरात मित्रांवर केवळ इम्प्रेशन पाडण्यासाठी परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तिघेरी पुण्यातच राहत होते. या गोळीबारामुळे खडकवासला परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
