Woman Molesting Shopping Centre Washroom: खरेदी केंद्राच्या शौचालयात महिलेचा विनयंभंग, हत्येचा प्रयत्न; मुंबई पोलिसांकडून सुरक्षा रक्षकास अटक
Mumbai Police | (Photo Credits: Marathi Latestly)

Man Harasses Woman: मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे नावाच्या 21 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या शौचालयात महिलेचा विनयभंग (Man Molesting Woman) आणि तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार 35 वर्षीय पीडिता याच विक्री केंद्रात (शॉपिंग सेंटर) कामाला आहे. ही महिला कामाच्या ठिकाणी प्रसाधनगृहात गेली असता आरोपीने तिच्यासोबत गैरवर्तन केले. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास फोर्ट परिसरातील लोकमंत्य टिळक मार्गावर असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये घडला, जिथे पीडितेचे कामाचे ठिकाण आहे. (Mumbai Crime)

सकाळी साडेसातच्या सुमारास घडली घटना

वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला सकाळी साडेसात वाजता मुंबई येथील शॉपिंग सेंटरच्या सार्वजनिक प्रसाधनगृहात (शौचालय) गेली होती. या वेळी 21 वर्षीय रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे हा तरुण शौचालयातच होता. त्याला पाहून पीडितेने आपणास हे शौचालय वापरायचे आहे. त्यामुळे ते खाली करुन देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करुन आपण निघून गेल्याचे आरोपीने नाटक केले. पण प्रत्यक्षात तो तिथेच थांबला. (हेही वाचा, Mumbai: दादरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक; 6 महिलांची सुटका)

आरोपीच्या पोटात लाथ मारुन पीडितेने केला स्वत:चा बचाव

पीडिता टॉयलेटमधून शौचालयाच्या बाहेरच्या भागात आली असता आरोपी तिथेच असल्याचे तिने पाहिले. आरपीला पाहून तिला धक्का बसला. ती घाबरली. इतक्यात आरोपीने शौचालयातून बाहेर पडण्याचा दरवाचा आतून बंद केला. ज्यामुळे पिडिता आणखीच घाबरली. या वेळी आरोपीने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्यास विरोध केला असता आरपीने तिच्या हत्येचा प्रयत्न केला. अखेर पीडितेने आरोपीच्या पोटात लाथ मारली. स्वत:चा बचाव करण्यासाठी पीडित महिलेने जोराने आरडा-ओरडा केला. (हेही वाचा, Juvenile Delinquency: क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकूने वार, 13 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल; मुंबई येथील घटना)

एक्स पोस्ट

दरम्यान, सदर घटनेची माहिती आझाद मैदान पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला तातडीने अटक केली. पोलिसांकडील माहितीनुसार आरोपीचे नाव रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, आरोपी हा सुद्धा याच विक्री केंद्राचा कर्मचारी आहे. तो या विक्री केंद्रात सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. दरम्यान, आरोपीवर विनयभंग, हत्येचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का याबाबत चौकशी सुरु आहे. न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.