हिंगणघाट (Hinganghat) येथील जळीतकांडातील पीडित शिक्षेकेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. हृदय विकाराचा धक्का आल्याने पीडीताची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज सकाळी 6.55 मिनिटांनी पीडिताने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात (Orange City Hospital and Research Centrer) अखेरचा श्वास घेतला. यावर संपूर्ण देशाभरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, महिला लोकप्रतिनीधीं सुप्रिया सुळे (Supriya Sule), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेतील पीडितेला जाळणारा आरोपी विकी नगराळेला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेत न्यायालयाने शुक्रवारी रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. त्यानंतर आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पीडितेवर नागपूर येथील रुग्णालयात पाठीमागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अधिकारी डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरु होते. गेल्या 7 दिवसांपासून ती या रुग्णालयात दाखल होती. तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. रविवारी तिच्यावर चौथ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुरुवातीला तिची प्रकृती स्थिर होती. मात्र, पुढे तिच्या शरीराने औषधं आणि उपचार यांना प्रतिसाद देणे हळूहळू बंद केले. रविवारी मध्यरात्रीपासून तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. तिचे ब्लडप्रेशरही कमी होत गेले. त्यानंतर सकाळी तिला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.

आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, पीडाताची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून यावर महिला प्रतिनीधींनीकडून संतप्त प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. हे देखील वाचा- वर्धा: हिंगणघाट पीडितेचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार; 'आरोपीला जिवंत जाळा किंवा आमच्या स्वाधीन करा' नातेवाईकांची मागणी.

सुप्रिया सुळे यांचे ट्वीट-

यशोमती ठाकूर यांचे ट्वीट-

चित्रा वाघ यांचे ट्वीट-

हिंगणघाट मधील जळीत कांडातील पीडितेचा मृतदेह स्विकारण्यास पीडितेच्या नातेवाईकांनी तयारी दर्शविली असली तरीही गृहमंत्र्यांनी आश्वासन लिखित स्वरुपात द्यावे ,यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर तिच्या कुटूंबियांनी मृतदेह स्विकारण्यास तयारी दर्शविली होती. मात्र, आता 'लिखित स्वरुपात आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे' सांगत मृत पीडितेच्या नातेवाईकांनी हिंगणघाटमध्ये ठिय्या आंदोलन केले आहे.