Krishnai Hospital | Twitter @KALWA02055835

ठाण्यामध्ये एका हॉस्पिटलचे सिलिंग कोसळून महिला जखमी झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या Regional Disaster Management Cell कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही घटना 5 जुलै, बुधवार रात्री 8-8.30 च्या सुमारास घडली आहे. Krishnai Hospital चं सिलिंग प्लॅस्टर कोसळलं आहे. Regional Disaster Management Cell कडे त्याची माहिती रात्री रात्री 11.35 च्या सुमारास आली आहे. हॉस्पिटल हे प्रतिभा सोसायटीमध्ये तळमजल्यावर आहे, ही चार मजली इमारत आहे जी अंदाजे 25 वर्षे जुनी आहे.

जखमी महिला ही कृष्णाई हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करत होती. संध्याबाई बापू पाडेकर असे जखमी महिलेचे नाव असून, त्या 68 वर्षीय कळवा, ठाणे येथील रहिवासी आहेत. संध्याबाईच्या डाव्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. तिला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नक्की वाचा: मुंबई मध्ये 197 जण मुंबईच्या अतिधोकादायक इमारती मध्ये वास्तव्याला; पोलिस बळाचा वापर करून रिकाम्या करणार इमारती .

संबंधित अधिकार्‍यांना रितसर सूचित करण्यात आले असून त्यांना या घटनेची प्रतिक्रिया म्हणून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

बुधवारी आणखी एका घटनेत, बुधवारी सार्वजनिक शौचालयाच्या दुसऱ्या मजल्यावरीललिविंग रूमच्या छताचे प्लास्टर कोसळले, त्यात दोन जण किरकोळ जखमी झाले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (टीएमसी) दिली आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.