Wolf | Representational image (Photo Credits: pxhere)

Wolf Attacks In Sangli: पिसाळलेल्या कुत्र्याचा माणसांवर आणि प्राण्यांवर हल्ला अशा बातम्या आपण अनकदा ऐकतो. पण, लांडगा पिसाळा आणि त्याने अनेकांना चावा घेतल्याचे आपण फारसे ऐकले नसेल. पण, असे घडले आहे. सांगली (Sangli News) जिल्ह्यातील जत तालुक्यात (Jat Taluka) असलेल्या दरीबडची येथील परिसरात एक लांडगा पिसाळला आहे. त्याने परिसरातील 6 जणांना चावा घेतला आहे तर जवळपास 29 जनावरांवर हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी (19 जून) घडली. सांगली हा मेंढपाळ बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात कुरनांमध्ये चरत असलेल्या मेंढ्यांची शिकार करण्यासाठी लांडगे बहुतांश वेळा येताना आढळतात. लांडग्यांपासून मेंढ्यांचे संरक्षण करणे हे मेंढपळांचे प्रमुख काम होऊन जाते. त्यातच आता लांडगा पिसाळल्याचे वृत्त आल्याने परिसरातील मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जखमींची नावे

वन विभागाने पिसाळलेल्या लांडग्यावर त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान, काही स्थनिक गावकऱ्यांनी लांडगा मृत्यू पावल्याचे म्हटले आहे. या लांडग्याने आतापर्यंत जवळपास पाच जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे खालील प्रमाणे:

सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

वरीलपैकी सर्वजण हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडची परिसरातील रहिवासी आहेत. या सर्वांना वैद्यकीय उपचारांसाठी सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सर्वांवर उपचार करणयात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, परिसरातील 29 जनावरांवरही लांडग्याने हल्ला केला आहे. त्यामुळे या जनावरांवरही आवश्यक उपचार करण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

गावकऱ्यांकडून लांडग्याचा पाटलाग

स्थानिक नागरिकांकडून दावा केला जात आहे की, पिसाळलेल्या लांडग्याचा मृत्यू झाला आहे. या लांडग्याचा गाव आणि परिसरातील नागरिक आणि दूरपर्यंत पाटलाग गेला. हा पाटलाग करताना परिसरातील कुत्रेही लांडग्याच्या पाठी लागले होते. त्यामुळे गावापासून दूर जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायाप्पा कन्नुरे यांच्या वस्तीजवळ या लांगड्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसर, दरीबडची परिसरातील लामणतांडा येथील शिवारात शालन हणमंत कांबळे यांच्या मालकीची डाळिंबाची बाग आहे. या बागेत काही महिला काम करत होत्या. या महिलांवर लांडग्याने अचानक हल्ला केला. या हल्लायात काही महिला गंभीर जखमी झाल्या. त्याच वेळी हा लांडगा पुढच्या मळ्यात गेला. तेथे त्याने भांगलण करत असलेल्या पार्वती सुरेश घागरे यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्यांच्या हातापायाला चावा घेतल्याने दुखापत झाली. दरम्यान, या लांडग्याने त्याच्या मार्गात येणाऱ्या जवळपास सर्वच जनावरांना चावा घेतला. ज्यामध्ये 26 जनावरे जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विश्वनाथ मोर्डी यांनी घटनास्थळी हजेरी लावून प्राण्यांचीही तपासणी केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखल होत परिस्थितीची माहिती घेतली.