महाराष्ट्रात (Maharashtra) अटोक्यात येत असलेल्या कोरोनाने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यातील विविध प्रमुख शहरात कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. यात मुंबईचाही (Mumbai) समावेश आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी मोठी वाढ चिंताजनक आहे. मुंबईत दररोज वाढत जाणारा कोरोनारुग्णांचा आकडा पाहता मुंबईत लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 90 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रातील आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची ही प्रकरणे फार गंभीर नाहीत, पण भारतातही युरोपप्रमाणे कोरोनाचा प्रसार मोठ्या वेगाने होत लागला आहे.
मुंबईत आज 3 हजार 775 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण संख्या 3 लाख 62 हजार 654 वर पोहचली आहे. यापैकी 3 लाख 26 हजार 708 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 11 हजार 582 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 23 हजार 448 सक्रीय रुग्ण आहेत. हे देखील वाचा- Covid-19 Vaccine चे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन होणे बंधनकारक नाही- BMC
मुबंई महानगरपालिकेचे ट्वीट-
21-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/ruPxTdprY9
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 21, 2021
महाराष्ट्रात आज 30 हजार 535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 11 हजार 314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 22 लाख 14 हजार 867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 10 हजार 120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.