भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? रायकीय चर्चांना उधाण
Eknath Khadse | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. यातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे (BJP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत (National Congress Party) प्रवेश करणार असल्याचे राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. एकनाथ खडसे हे नाराज असून भाजप सोडणार असल्याचे चर्चा रंगली होती. यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया देत मी पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी वक्तव्य केले होते. परंतु, भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या मेळ्यावात एकनाथ खडसे यांनी लक्षवेधी विधान केले आहे. ‘पंकजा पक्ष सोडणार नाहीत. मात्र माझं माहिती नाही. माझ काय सांगता येत नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. यानंतर ते नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर नव्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने 12 डिसेंबर रोजी बीड येथे एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पक्षातील नेत्यांच्या विरोधात भाषण केले होते. दरम्यान, पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत. मात्र, माझे काही सांगता येत नाही, असे विधान त्यांनी केले होते. यातच एकनाथ खडसे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खडसे भाजपला सोडचिठ्ठि देऊन दुसऱ्या पक्षात जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. हे देखील वाचा- Nagpur Winter Session 2019: विधिमंडळामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हणून फाडलं भाजपाचं बॅनर; पहा हाणामारीचं कारण काय?

नागपूर येथे पार पडणाऱ्या बैठकीनंतर बैठकीनंतर खडसे कोणत्या पक्षात जातील हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठीला देऊन राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षात प्रवेश करणार, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.