महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) बारामतीकरांनी (Baramati) अजित पवार (Ajit Pawar) यांना विजयी केल्याबदल जनेतेचे त्यांनी आभार मानले. दिवाळीच्या निमित्ताने जनेतेला भेटण्यासाठी अजित पवार बारामतीत पोहचले होते. विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांनी जो प्रतिसाद दिल्याबदल त्यांचे यापुढे त्यांचे कोणतीही कामे पूर्ण केली जाईल, असे अश्वासनही अजित पवार यांनी त्यावेळी दिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ( BJP) बहुमताच्या जोरावर एकहाती सत्ता स्थापन केली होती. परंतु, या निवडणुकीत भाजपच्या वाटेला अपुरे यश आले आहे. यामुळे कोणता पक्ष भाजपला पाठिंबा देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अजित पवार यांना सत्तेत स्थापन होणार? की राष्ट्रवादी पक्षात राहून काम करणार? असा प्रश्न विचारला गेला. यावर येत्या 30 तारखेला पक्ष निर्णय घईल, असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप- शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचा किल्ला ढासळत असल्याचे लक्षणे दिसत होती. परंतु, शरद पवार यांच्या आक्रमक भुमिकेने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक चांगले यश मिळवून दाखवले. दरम्यान, अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढत होते. त्यावेळी मतदाराने अजित पवार यांच्या खात्यात मत टाकून त्यांना विजयी करुन दिले. यावर अजित पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहे. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, "आजपर्यंत कोणाताच उमेदवार या मतदारसंघात एवढ्या मताने जिंकून आला नाही. यासाठी कोणत्या शब्दात बारामतीकरांचे आभार मानू माझ मलाच कळत नाही. तसेच बारामतीकरांकडून पवार कुटुंबियांना नेहमीच भरभरुन प्रेम मिळत असल्याची भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली". हे देखील वाचा- शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना सत्ता स्थापनेनंतर मिळू शकते या तीन मंत्रालयांची जबाबदारी
दरम्यान, एका पत्रकाराने त्यांना सत्तेत सहभागी होणार की राष्ट्रवादी पक्षात राहून विरोधीपक्षनेता म्हणून काम करणार असा प्रश्न विचारला होता. येत्या 30 ऑक्टोबरला पक्षाची बैठक होणार असून त्यावेळीच हा निर्णय घेतला जाईल, असे उत्तर अजित पवार यांनी न्युज 18 लोकमतच्या पत्रकाराला दिले.