मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । Photo Credits: Twitter / ANI

महाविकास आघाडीच्या 100 दिवसांकचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आज (3 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपला अनुभव व्यक्त केला. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास विकास आघाडीत शिवसेनेची कसोटी लागणार्‍या मुस्लीम आरक्षण ते NPR बाबत महत्त्वाच्या विषयांवर भूमिका स्पष्ट करताना सावध आणि संयमाची भूमिका घेतली आहे. दरम्यान NPR लागू करण्याबाबत बोलताना त्यांना महाष्ट्रात नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर बाबत भूमिका घेण्यापूर्वी शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी पक्षाची समन्वय समिती स्थापन करून पुढील निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस पूर्ण; मुस्लीम आरक्षण, सामना संपादक पद ते NPR बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका.  

दरम्यान सध्या CAA, NRC वरून दिल्लीसह देशभरातील अनेक ठिकाणी तणावाची स्थिती आहे. अशामध्ये महाराष्ट्रात हे कायदे लागू करण्यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेचं हित पाहिले जाईल, राज्यात कोणत्याही धर्माच्या लोकांना धक्का लागणार नाही याची घेऊन पुढील पावलं उचलली जातील असं आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेमधून जनतेला दिलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे मित्र पक्ष असलेल्या एनसीपीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नागरिकत्त्व दुरूस्ती कायदा लागू करताना जनतेचं हित पाहिलं जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ अजित पवार यांच्याकडून CAA, NRC चं समर्थन? म्हणाले राज्यातील लोकांना घाबरण्याची गरज नाही.

ANI Tweet

मराठा आरक्षणासोबतच राज्यात 5% मुस्लीम आरक्षणाची मागणी जोर धरत असताना याबाबत माझ्याकडे अद्याप कोणताही विषय आला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सरकार मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर कायदा करण्यात येईल, असं एनसीपी नेते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव आमच्यापुढं नाही. तोपर्यंत विरोधकांनी आदळआपट करण्याची गरज नाही. ही एनर्जी मुद्दा आल्यावर वापरण्यासाठी जपून ठेवा.'