Ashok Chavan on BJP: काँग्रेस सोडण्याचे कारण काय? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर
Ashok Chavan | (Photo Credits: Facebook)

Will Ashok Chavan join BJP: माझ्या जन्मापासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आलो. पक्षानेही मला खूप सारे दिले. पण त्या बदल्यात मीसुद्धा पक्षासाठी बरेचकाही केले. आता मला वाटते मी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचा राजीनामा (Ashok Chavan Quit Congress) दिल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? असे विचारले असता, मला भाजपची कार्यप्रणाली माहिती नाही. त्यामुळे तूर्तास तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मी कोणताही विचार केला नाही. मात्र, दोन दिवसांनी मी माझा निर्णय जाहीर करेन, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेस सोडण्याचे कारण काय?

प्रसारमाध्यमांनी काँग्रेस सोडण्याचे कारण काय? विचारले असता  अशोक चव्हाण म्हणाले, विशेष असे कारण नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असावंच लागतं असं नाही. माझ्या जन्मापासून, पाठिमागील अनेक वर्षे मी काँग्रेससाठी काम करत आलो. मात्र, आता मला इतर पर्यायांचा विचार करायला हवा असे वाटले म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. इतर कोणत्याही पक्षात जाण्याविषयी अद्याप तरी निर्णय झाला नसल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, Ashok Chavan Quit Congress Likely to Join BJP: अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा पंजा; भाजपच्या कमळाला हात देण्याची शक्यता)

काँग्रेसमध्ये मतभेद?

काँग्रेसमध्ये असलेला अंतर्गत वाद, धुसफूस आणि राजकाणामुळे आपण पक्ष सोडत आहात का? असे विचारले असता ते म्हणाले, शेवटपर्यंत मी काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिकपणे काम केले. काल झालेल्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठीकसही मी उपस्थित होतो. आता मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मला कोणतीही उणीदुणी काढायची नाहीत. माझा तो स्वभावही नाही, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी अधिक भाष्य करणे टाळले. मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Nana Patole In Delhi: नाना पटोले दिल्ली दरबारी; मुंबईपाठोपाठ, महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?)

किती आमदार सोबत येणार?

आपण काँग्रेस सोडता आहात. आपल्यासोबत इतरही काही आमदार येणार आहेत काय? याबाब प्रसारमाध्यमांनी विचारले असता, मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तो देताना इतर कोणत्याही आमदाराशी चर्चा केली नाही. त्यामुळे कोण सोबत येणार किंवा नाही याबाबत मला माहिती नाही. मी माझा निर्णय घेतला आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी राजीनामा देताच काँग्रेस पक्षात हालचाली वाढल्या आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणकोणत आणि किती आमदार जाऊ शकतात, याबाबत चाचपणी केली जात आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले. दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.