उमर खालिद आणि जावेद अख्तर यांच्याबरोबर CAA विरोधी कार्यक्रमात आदित्य ठाकरे राहणार का उपस्थित? पहा शिवसेनेचे उत्तर
Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

Shivsena On Aaditya Thackeray's Presence In Anti-CAA Event: शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात निषेध व्यक्त करणाऱ्या रॅलीमध्ये उपस्थित राहणार की नाही याबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी केली नाही, असे पक्षाने शनिवारी सांगितले आहे. शिवसेना पक्षाने एक ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. "CAA (Citizen Amendment Act 2019), एनआरसी विरोधी छात्र भारती या विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे हे हजेरी लावणार असल्याची पुष्टी अद्याप नाही," असे शिवसेनेच्या संवाद शाखेने ट्विट केले.

तसेच ट्विट मध्ये असेही लिहिण्यात आले होते की, "त्यांच्या (आदित्य) कोणत्याही वेळापत्रकांसाठी आणि कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या अधिकृत संपर्क दलाशी संपर्क साधावा."

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीचा दावा करणाऱ्या आमंत्रण पत्रिकेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे विधान समोर आले आहे.

निमंत्रण पत्रकानुसार मुंबईतील कार्यक्रमात आदित्य ठाकरे, गीतकार जावेद अख्तर, उमर खालिद, रमा नागा, रोहित पवार आदींसह सामील होतील असे लिहिले होते. हा कार्यक्रम 5 जानेवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेन्टरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

CAA ला शरद पवार यांचा विरोध; एल्गार परिषदेच्या कारवाईची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी

जेएसी मुंबई, एआयएसएफ, एसएफआय, एएसए, टीआयएसएस स्टुडंट्स युनियन, सम्यक, एमएएसयू, एसआयओ, सीवायएसएस, पीएसयू, रिपब्लिकन पँथर, एआयपीसी, एवायडब्ल्यू, विद्यार्थी भारती आणि मुंबई ग्रॅज्युएट फोरम या सर्व विद्यार्थी संघटना दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.