Wildlife Organ Smuggling Thane: वन्यप्राणी अवयव तस्करी प्रकरण; ठाणे येथील आरोपीकडून बिबट्यासाठी सापळा, घरात सापडले रानडुक्कर
Leopards | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Thane News: ठाणे येथून डॅनी गोन्सावलिस नामक एका 30 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर वन्य प्राण्यांची शिकार आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी (Wildlife Organ Smuggling Case) केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असलेल्या उत्तन पालखाडी परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली. आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच भाईंदर परिसरातील उत्तन परिसरात सापळा लावून बिबट्याला (Leopards) सापळा लावून पकडण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर वन विभाग सतर्क झाला होता.

पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीला वन्य प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचा त्याचा विचार होता. बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याला बिबट्याची कातडी, नखं आणि इतर काही अवयव काळ्या जादूसाठी बाजारात विकायचे होते. त्यासाठी तो सापळा लावत असे. आरोपी रानडुक्करांचीही शिकार करत असे. मात्र, त्याने त्यातएक पुढचे पाऊल टाकत बिबट्याची शिकार करण्याचा विचार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पुढे आला आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांना दोन रानडुक्करंही आढळून आल्याची माहिती आहे.

सांगितले जाते की, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये वन्य प्राण्यांच्या अवयवांना खास करुन, नखं, कातडी, शिंग, दात, केस आणि इतरही काही अवयव यांना प्रचंड मागणी आहे. आरोपीने आर्थिक आमिशाने या आधीही वन्य प्राण्यांची शिकार करुन त्यांचे अवयव काळ्या बाजारात विकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Leopards Increased in India: भारतात गेल्या 4 वर्षात बिबट्यांच्या संख्येत 60 टक्क्यांची वाढ; मध्य प्रदेशात सर्वाधिक तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर)

दरम्यान, उत्तर रिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एक मादी बिबट सापळ्यात अडकल्याचे आढळून आले होते. सापळ्यातून सुटण्यासाठी बिबटने खूप प्रयत्न केले. परंतू, जीवाचा आटापीटा करुनही बिबटला सापळ्यातून बाहेर पडता आले नाही. सापळ्यातून सुटण्याच्या धडपडीत बिबटच्या होके आणि पायांसह पोट आणि पाठीवरही अनेक जखमा झाल्या. पंजाचा भागही खरवडून निघाला. वन्य अधिकाऱ्यांनी बिबटची सुटका केली. दरम्यान, एका खासगी जागेत वन्य अधिकाऱ्यांना दोन खासगी रानडुक्करंहगी आढळून आली. त्यांचीही सुटका वन्य अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती आहे.