लष्करी सेवेत अधिकारी (Military Officer) असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी त्याच्या गुप्तांगाला केमिकल लावण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराबद्दल या अधिकाऱ्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर (Ahmednagar) येथील रांजणी गावात ही घटना घडली आहे. अतिशय विचित्र आणि तितकाच धक्कादायक असलेल्या या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, नगर तालुका पोलीसांनी तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती अशी की, या प्रकरणातील फिर्यादी हा लष्करी सेवेत आहे. गेल्याच वर्षी त्याचा विवाह झाला असून, नोकरीनिमित्त तो परराज्यात असतो. कारण त्याची कर्तव्य बजावण्यासाठी नियुक्तीच तिकडे झाली आहे. दरम्यान, विवाहानंत पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर त्याच्या गुप्तांगाला प्रचंड वेदना होत असत. त्याने अनेक डॉक्टरांकडून उपचार करुन घेतले. मात्र, फरक पडला नाही. संबंध ठेवल्यानंतर वेदना सुरुच असत. दरम्यान, काळात त्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे या अधिकाऱ्यासोबतचे वर्तनही बदलले होते. ती त्याच्याशी चांगली वागत नव्हती. त्यातच या अधिकाऱ्याला त्याची पत्नी फोनच्या माध्यमातून एका तरुणासोबत बोलत असल्याचे आढळले. त्यामुळे अधिकाऱ्याला संशय आला. त्याने कुटुंबीयांच्या मदतिने पत्नीवर पाळत ठेवली.
दरम्यान, लष्करी अधिकारी असलेल्या या पतीने व त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या पत्नीचा मोबाईल आणि त्यावरुन झालेले कॉल रेकॉर्डिंग तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आला. ज्या तरुणासोबत पत्नी बोलत होती तो तिचा प्रियकर होता. त्यानेत तिला पतिच्या गुप्तांगाला केमिकल लावण्यास सांगितले. या प्रकाराबाबत पत्निकडे कसून चौकशी केली असता तिने या प्रकाराची कबूली दिली. पत्नीने सांगितले की, तिचे गावातीलच एका तरुणावर प्रेम होते. त्याला तिच्यासोबत विवाह करायचा होता परंतू ते शक्य झाले नाही. मात्र, त्यांच्यातील संवाद मात्र कायम होता. विशेष म्हणजे हा तरुणही लष्करी सेवेत आहे. (हेही वाचा, बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या)
दरम्यान, प्रियकर तरुणाच्या सांगण्यावरुनच पत्नीने बाजारातून विशिष्ट प्रकारचे केमिकल असलेला मलम आणला. तसेच, शरीरसंबंधावेळी ती त्याच्या गुप्तांगाला तो मलम लावत असे. जेणेकरुन पतीचा मृत्यू व्हावा. पत्नीने दिलेली ही माहिती ऐकूण पती आणि त्याच्या कुटुंबियांना एकच धक्का बसला. त्यातून कसेबसे सावरलेल्या कुटुंबीयांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसेच, पुढील तपास सुरु केला आहे.