Extra Marital Affair: 3 मुलांची आई असलेल्या महिलेचे विवाहबाह्य आले उघडीस; पतीने प्रेमीला घरात एकत्र राहण्यास नाकरल्याने चढली थेट इलेक्ट्रिक पोल वर (Watch Video)
Extramarital Affairs | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला आहे. एका महिलेचे विवाहबाह्य संबंध समोर आल्यानंतर तिने इलेक्ट्रिकच्या खांब्यावर चढून हंगामा केला. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना गोरखपूरच्या Pipraich भागातील असून सोशल मीडीयात त्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. 34 वर्षीय महिला राम गोविंद नावाच्या पुरूषासोबत विवाहबद्ध होती. राम गोविंद मजूर म्हणून काम करत होता. या जोडप्याला 3 मुलं होती.

राम च्या पत्नीचं शेजारच्या गावातील एक व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. पतीच्या मागे 7 वर्ष ती दुसर्‍या पुरूषासोबतही होती. रामला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची भणक लागताच तो भडकला. त्याचे पत्नीसोबत वाद झाले. दरम्यान पत्नीनेही आपल्या प्रेमीला पती सोबत घरात रहायला द्यावे आणि आर्थिक हातभार लावायला द्यावा असं म्हटलं. राम गोविंदने तिचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. मग त्याची पत्नी चक्क इलेक्ट्रिक पोल वर चढली. या पोल वर अनेक हाय टेंशनच्या वायर होत्या.

महिला पोलवर चढल्याचं पाहून गर्दी जमा झाली. त्यांनी महिलेला खाली उतरण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न केले. महिला पोलवर चढल्याचं समजताच प्रशासनाची टीम धावली. त्यांनी वीजपुरवठा खंडीत केला. महिलेची गोड बोलून समजूत काढली आणि तिला खाली उतरवलं.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील एक महिला तिच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्याची मागणी करत मोबाईल टॉवरवर चढली होती. महिलेने आरोप केला आहे की तिच्या प्रियकराने तिची फसवणूक केली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन देण्यास नकार दिला. ही घटना यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यातील भिटौली पोलीस स्टेशन परिसरात सेमरा राजा टोल प्लाझाजवळ घडली.