Sanjay Raut & Varsha Raut (Photo Credits: Facebook)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने समन्स बजावला असून 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्या (PMC Bank Fraud) प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी 4 जानेवारी रोजी ईडीकडून वर्षा राऊत यांची तब्बल साडेतीन चार तास चौकशी करण्यात आली होती. तत्पूर्वी ईडीने 11 डिसेंबर रोजी वर्षा राऊत यांना नोटीस धाडली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप रंगले.

वर्षा राऊत 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. परंतु, त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ मागितली होती. दरम्यान, ईडी विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याची बातम्या समाजमाध्यमांमध्ये फिरत होत्या. संजय राऊत यांनी या वृत्ताचे खंडन केले असून बेकायदेशीर आणि राजकीय सूडाच्या कारवाईस कायदेशीर उत्तर देऊ असे ट्विट त्यांनी केले होते. (ED विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार या बातम्या चूकीच्या; सुडाच्या कारवाईला कायद्यानेच चोख उत्तर देऊ: संजय राऊत)

ANI Tweet:

पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी वर्षा राऊत यांनी ईडीने समन्स बजावला आहे. हे प्रकरण HDIL च्या वाधवान बंधूंच्या PMC बँक घोटाळ्याशी संबंधित आहेत.

दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथे HDIL एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम करत होतं. मात्र त्यात गडबड आढळून आल्याने वाधवान बंधून अटक करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. मात्र आता हे प्रकरण ED कडे सोपवण्यात आलं आहे.