महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्ष का अडून बसलाय?
Uddhav Thackeray and Aditya Thackeray | ( Photo Credits: Twitter/Shiv Sena)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अद्याप सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. तर शिवसेनेकडून आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी भाजपकडे केली जात आहे. तर सत्ता स्थापनासाठी अवघे काही तास शिल्लक असून कोणाचा मुख्यमंत्री होणार हे गुलदस्त्याच आहे. शिवसेनेने भाजपला 50-50 चा फॉर्म्युला सुद्धा सांगितला आहे. परंतु यावर भाजपकडून कोणतीच भुमिका घेण्यात आली नाही. तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही पक्षांच्या बैठका पार पडत आहेत. मात्र तरीही सत्ता स्थापनाबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. एवढेच नाही शिवसेना मुख्यमंत्री पदावर कायम असून त्यांना मागे हटायचे नाही.

शिवसेना का मुख्यमंत्री पदावर अडून राहिलेय?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे बळ भाजपच्या समोर कमजोर होताना दिसुन येत आहे. त्याच्याच फायदा भाजपला होत आहे. 2014 मध्ये लोकसभा-विधानसभा आणि पुन्हा 2019 मध्ये विधानसभा आणि लोकसभा अशी समीकरणे जुळल्याने भाजप समोर शिवसेनेचे तुल्यबळ थोडे डगमगताना दिसून आले आहे. भाजपने शिवसेनेसोबत काही अटी ठेवल्यांतर युती केली. मात्र यावेळी भाजपची शिवसेनेकडून चांगलीच कोंडी केली जात आहे. शिवेसेनेच्या सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंत्रीमंडळात फक्त 13 जागा देणारी भाजप आता उपमुख्यमंत्री पद आणि सारखे मंत्री देण्यासाठी तयार झाले आहे. त्यामुळे आता अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा भाजप तयार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.(आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार ही अफवा; शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही- संजय राऊत)

खरंतर सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांशिवाय कोणताही राजकीय पक्ष त्यांचे नियम लागू करत शकत नाही. तसेच कायदा व्यवस्थाबाबत महत्वाचे निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही. शिवसेनेची ओळख ही आक्रमक राजकरणावादी आहे. यामध्येच पक्ष कधीच मान्य करणार नाही की त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जाईल. कारण पक्षाच्या प्रमुखांना असे वाटते की तो ट्रिगर पॉइंट असून पक्षाचा मुख्यमंत्री पद घेऊन युतीमध्ये पुन्हा मोठ्या भावाची भुमिका साकारु शकते. मात्र यामध्ये एक धोका सुद्धा आहे की, सर्वात जुन्या राजकीय युतीमधील एक शिवसेना-भाजपला त्याचा फटका बसणार आहे.