दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने PFI शी जोडलेल्या परिसरात देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रात एकूण एकूण 12 ठिकाणी धडक कारवाई करत एकूण 20 जणांना ताब्यात घेतलं. या घटनेचे पडसाद म्हणून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा पुण्यात देण्यात आल्या. यानंतर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही लवकरचं कडक कारवाई करू अशी प्रतिक्रीया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही? भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? असे सवाल विचारत भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बीड (Beed), मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूरसह (Kolhapur) अशा विविध ठिकाणी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या (Pakistan Zindabad) घोषणा दिल्याचे पडसाद राजकिय वर्तुळात उमटत आहेत. (हे ही वाचा:- Aurangabad: औरंगाबादेत राडा! मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पीएफआयच्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न)
PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही?भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच PFI चा फायदा होतो https://t.co/kF5YtR5Bsb
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2022
तरी संबंधीत घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल तपास करण्याची माहिती दिली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तर थेट देशाचे मुख्यमंत्री अमित शाहांना पत्र लिहत घडलेल्या प्रकार हिंदू बांधव सहन करणार नाही असा इशारा दिला. तरी या प्रकरणाचा तपास सुरु असुन देशातील विविध राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत.