दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने PFI शी जोडलेल्या परिसरात देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रात (Maharashtra) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बीड (Beed), मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूरसह (Kolhapur) एकूण 12 ठिकाणी धडक कारवाई करत एकूण 20 जणांना ताब्यात घेतलं. संबंधित घटनेचे पडसाद काल पुण्यात उमटले. ईडी (ED) सीबीआयच्या (CBI) कारवाई विरोधात PFI च्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन केली. तसेच ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या (Pakistan Zindabad) घोषणा दिल्या. यातील काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतलं आहे. संबंधित घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आक्रमक पावित्रा घेतला असुन या बाबत थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहत आक्रमकतेचा इशारा दिला.
तरी आज सकाळी औरंगाबादेत (Aurangabad) मनसेने (MNS) पीएफआयच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचं समोर आले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील पीएफआयच्या (PF) कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे (Amit Bhange) आणि कार्यकर्ते आज सकाळी शहरातील जिन्सी भागातील पीएफआय (PFI) कार्यालयावर जाऊन धडकले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तरी याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. (हे ही वाचा:- Eknath Shinde On PFI: पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य)
दोन दिवसापूर्वी झालेल्या छापेमारीत औरंगाबाद (Aurangabad) मधून एकूण पीआयएफच्या (PIF) चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यांची नावं परवेज खान मुजम्मील खान, मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजल सय्यद खलील आणि शेख नासेर शेख साबेर उर्फ नदवी यांना अटक करण्यात आली असुन या चौघांची ही सखोल चौकशी सुरु आहे.