Chhatrapati Sambhaji Nagar HeartAttack Video: धावपळीच्या जीवनात तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे झटक्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीच्या काळात वय वर्ष ६० वर्ष असलेल्या लोकांना याचा धोका जाणवायचा, परंतु गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हा धोका जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. दारू आणि सिगारेट हेच कारणं याला जबाबदार नाहीत तर वैज्ञानिकानुसार अनेक कारणे समोर येत आहे. अशीच एक घटना समोर येत आहे. झुम्बा डान्स करत असताना, एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. झुम्बा क्लासमध्ये झुम्बा करत असताना असताना एक तरुण जमीनीवर कोसळला. त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. क्लासमध्ये झुम्बा डान्स करताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- केदारनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळून 3 भाविकांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता (Watch Video)
मौत का लाइव वीडियो pic.twitter.com/mCeN9JMJDM
— parmod chaudhary (@parmoddhukiya) July 21, 2024
व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, 5 ते 6 जण क्लासमध्ये झुम्बा करत आहे. मागच्या रांगेत असलेला तरुणांला अचनाक चक्कर सारखे जाणवते तो खांब्याचा आधार घेत उभा राहतो. काही वेळाने तो अचानक जमिनीवर कोसळतो. त्याच्या मित्रांनी पाहले आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर कोसळताच, त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर क्लासमध्ये एकच खळबळ उडाली.