दहावी आणि बारावीच्या परिक्षा (10th and 12th Exams) साधरणता फेब्रुवारी आणि मे महिन्यात पार पडतात. मात्र, यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षी दहावी बारावीच्या परिक्षा कधी होणार? याबाबत विद्यार्थ्यांसह पालकवर्गांमध्येही चिंता आहे. दरम्यान, यावर्षी दहावी आणि बारावीची परिक्षा एप्रिल आणि मे महिन्यात पार पडणार असल्याची शक्यता महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी व्यक्त केली आहे. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा कोरोनाच्या पुढील परिस्थितीवर ठरण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या आहेत.
कोरोना संकटामुळे गेल्या नऊ महिन्यापासून महाराष्ट्रातील बहुतेक शाळा बंदच आहेत. महत्वाचे म्हणजे, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष हे त्यांच्या भविष्याची दिशा ठरवणारे असते. यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षा कधी होणार? असा प्रश्न पालकवर्गांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीपर्यंत राज्य शालेय माध्यम शाळा या पुढील परिस्थितीतवर ठरवण्यात येईल. सध्या नव्या स्टेंटची भीती असल्यामुळे रूग्ण संख्या वाढते की कमी होते, परदेशात कोरोना नव्याने विषाणू याचा नेमका काय परिणाम होतो. याचा अंदाज घेऊनच इतर शालेय वर्ग सुरू करण्साचे ठरवण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Pune Schools Reopens: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 वी ते 12 वी चे वर्ग 4 जानेवारी पासून पुन्हा सुरु होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्ष लांबले आहे. एवढेच नव्हेतर बोर्डाच्या परिक्षाही उशीरा होणार असल्याचे माहिती समोर आली आहे. तर, दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल 15 जुलैच्या आत लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.