अजित पवार यांच्यावर नेमकी काय कारवाई झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण पत्र; वाचा सविस्तर
Ajit Pawar | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवत राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भल्या पहाटे घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. ही घटना इतकी धक्कादायक होती की या प्रकारामळे शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या पोटात गोळा आल्याची स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्राची सकाळच प्रचंड आश्चर्याने भारुन गेली. मात्र, जसजसा दिवस पुढे सरकू लागला तसतसा भाजपच्या बाजूने सुरु झालेला हा दिवस राष्ट्रवादीच्या बाजूने झुकत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मुंबई येथील वाय. बी. सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांचे बंड मोडून काढण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती राष्ट्रवादीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. काय म्हटले आहे या पत्रात? वाचा सविस्तर..

आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी दु.4.30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणू 2019 मध्ये निवडून आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या सदस्यांची मा. खा. श्री. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार श्री. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्दरेश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले.

1. आमदार श्री. अजित अनंतराव पवार यांची दिनांक 30 ऑक्टोबर 2019 रोजी विधीमंडळ पक्षनेता, महाराष्ट्र विधानमंडळ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी या पदी ठरावाद्वारे निवड करण्यात आली होती. असे असताना त्यांनी भाजप बोरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याची भुमीका घेतली. ती पक्षाच्या ध्येय-धोरणाशी सुसंगत नाही व मान्य नाही. सबब ही निवड आज रोजीच्या ठरावाद्वारे रद्द करण्यात येत आहे.

2. विधीमंडळ कामकाज नियम, इतर अनुषंगिक नियम व संविधानाप्रमाणे आज शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2019 पासून श्री अजित अनंतराव पवार यांचे व्हीप काढण्याचे व पक्षनेता म्हमऊन असलेले सर्व अधिकार रद्दबादल करण्यात आले आहेत.

3. आमदार श्री. अजित अनंतराव पवार यांनी घेतलेल्या भुमिकेबद्दल पक्षाच्या वतीने पुढील निर्णय घेण्याच्या दृष्टीने अंतीम निर्णय घेण्याचे अधिकार मा. खा. श्री. शदरचंद्र पवार, राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार मा. श्री. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष यांना देण्यात येत आहे. (हेही वाचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळ गटनेता पदावरुन हकालपट्टी; व्हिप काढण्याचे अधिकार जयंत पाटील यांच्याकडे)

4. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेता पदाचे सर्व संविधानिक अधिकार आमदार श्री. जयंत पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी यांना देण्यात येत आहेत.

उपरोक्त बैठकीस आम्ही खालील उपस्थिती निर्वाचित विधानसभा सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी उपरोक्तपणे ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल सह्या करत आहेत.

एनसीपी ट्विट

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीने एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकात म्हटले आहे की, आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी दु.4.30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणू 2019 मध्ये निवडून आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या सदस्यांची मा. खा. श्री. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार श्री. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्दरेश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले.