Western Railway Ticket Checking Drive: विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर पश्चिम रेल्वेने (Western Railway) मोठी कारवाई केली आहे. एप्रिल 2024 मध्ये तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान (Ticket Checking Drive) पश्चिम रेल्वेने 20 कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळाव्यात तसेच तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांच्या त्रासाला आळा घालण्यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्सवर तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अत्यंत प्रेरित तिकीट तपासणी पथकाने एप्रिल 2024 मध्ये अनेक तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले होते. त्याद्वारे 20.84 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली, ज्यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील 5.57 कोटी रुपयांचाही समावेश आहे. (हेही वाचा -Central Railway's Ticket-Checking drive: मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवाशांकडून वसूल केला 100 कोटींचा दंड)
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, एप्रिल 2024 मध्ये, बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह 2.94 लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांच्या शोधातून 20.84 कोटी रुपये वसूल करण्यात आले. तसेच, एप्रिल महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात 98 हजार प्रकरणे शोधून 5.57 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल 2024 मध्ये 4000 हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला. (वाचा - Western Railway Ticket Checking Drive: पश्चिम रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश; 60,000 अनधिकृत प्रवाशांकडून आकारला 173.89 कोटी रुपयांचा दंड)
याशिवाय, पश्चिम रेल्वेने “BATMAN 2.0” तिकीट तपासणी मोहीम देखील आयोजित केली होती, ज्याचा उद्देश रात्रीच्या वेळी अनधिकृत तिकिट प्रवासाच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. या उपक्रमांतर्गत, बॅटमॅन पथकाने 03/04 आणि 04/05 मे 2024 च्या मध्यरात्री सुमारे 3.40 लाख रुपयांचा दंड वसूल केला. तथापी, पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांना योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.