Mumbai Traffic Jam: मुंबईमधील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या (Western Express Highway) दोन्ही बाजूंनी वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबचं-लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या काही तासांपासून प्रवासी वाहनांमध्ये अडकले आहेत. वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज पहाटे अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Andheri Western Express Highway) मेट्रोचा क्रेन (Metro Crane) कोसळून भीषण अपघात झाला होता. सध्या हे क्रेन बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आज पहाटे झालेल्या अपघातामुळे क्रेनचा काही भाग अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Metro Crane Accident In Mumbai: अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोचा क्रेन कोसळून भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू)
Mumbai: One dead & two injured as a crane lost control & collided with Metro pillar at Andheri Gundavali bus stop near Western Express Highway
A woman standing at the bus stop got trapped under the rear wheels of crane & died on the spot while 2 others were rushed to hospital pic.twitter.com/ZDZamfkReb
— ANI (@ANI) October 31, 2020
दरम्यान, आज पहाटे 6 वाजताच्या सुमारास मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोचा क्रेन कोसळून एका महिला मृत्यू झाला. चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर चालक फरार झाला होता. अपघातग्रस्त क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे येथे घेऊन जाण्यात येत होतो. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात क्रेनचे दोन तुकडे झाले. तसेच क्रेनचा काही भाग तेथील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर पडला. यात तिचा जागेवर मृत्यू झाला.
अपघातात मृत झालेली महिला अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ उभी होती. मात्र, यावेळी या महिलेवर काळाने घाला केला आणि अपगातग्रस्त क्रेनचा काही भाग तिच्या अंगावर कोसळला. फाल्गुनी पटेल असं या मृत महिलेचं नाव होतं. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध घेत आहेत.