Metro Crane Accident In Mumbai: अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोचा क्रेन कोसळून भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू
Metro Crane Accident In Mumbai (PC _ANI)

Metro Crane Accident In Mumbai: मुंबईमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. शहरातील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Andheri Western Express Highway) मेट्रोचा क्रेन (Metro Crane) कोसळून एका महिला मृत्यू झाला. ही महिला बस पकडण्यासाठी बसस्टॉपवर उभी होती. तसेच अपघात झालेला क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे येथे घेऊन जाण्यात येत होतो. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत क्रेनचे दोन तुकडे झाले आहेत. तसेच क्रेनचा काही भाग अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णांलयात दाखल करण्यात आलं आहे. अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताचं स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव फाल्गुनी पटेल, असं आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस या चालकाचा शोध घेत असून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (हेही वाचा -  Mumbai Police: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचे उच्च न्यायालयाकडून तोंडभरुन कौतुक)

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा अपघात झाला. मेट्रोची क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे या ठिकाणी घेऊन जाण्यात येत होती. परंतु, यादरम्यान, चालकाचे क्रेनवर नियंत्रण सुटले आणि क्रेन मेट्रोच्या पिलरला जाऊन आदळला. या अपघातात क्रेनचे दोन तुकडे झाले.

दरम्यान, अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर क्रेनचा काही भाग कोसळल्याने तिचा जाग्यावर मृत्यू झाला. तसेच या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. या दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध घेत आहेत.