Mumbai Police: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचे उच्च न्यायालयाकडून तोंडभरुन कौतुक
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

कोरोनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत पाहायला मिळाला होता. मुंबईत कोरोनाची भयंकर परिस्थिती असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुंबई पोलिसांचे तोंडभरून कौतूक केले आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठाने गुरुवारी मुंबई पोलिसांनी कठीण काळात भन्नाट काम केल्याचे म्हटले. तसेच जगभरात त्यांची वाहवा होत असून मुंबई पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जातात, असेही मत त्यांनी नोंदवले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारने आखलेल्या नियमांचे उलंघन होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस अहोरात्र मेहनत घेत होते. कोरोनाचे संकट असतानाही मुंबई पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडल आहे. यामुळे मुबंई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे. साथीरोगाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांची ड्युटी खूप कठीण होती. मुंबई पोलीस आधीच खूप तणावात आहेत. त्यांना 12-12 तास ड्युटी करावी लागते. त्यानंतर येथे मिरवणूक, मोर्चे यांचा बंदोबस्त देखील असतो, अशा विपरीत परिस्थितीत मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जाते. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते, असे न्यायमूर्ती शिंदे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Lockdown in Maharashtra Extended: महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवला; Mission Begin Again अंतर्गत चालू करण्यात आलेल्या सेवा मात्र नियमित सुरु 

महाराष्ट्रातील 26 हजारांपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यापैकी 24 हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1 हजार 517 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत.