Maharashtra Political Crisis: 'आम्ही फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत'; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापनेचे संकेत
Raosaheb Patil Danve | (Photo Credits: ANI)

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील (Maharashtra) सध्या सुरू असलेले राजकीय संकट आणि गुवाहाटीतील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्यात लवकरच भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, ते केवळ फक्त दोन-तीन दिवस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. दानवेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.

रावसाहेब दानवे यांनी एबीपी मराठी वाहिनीसी बोलताना सांगितलं की, बहुमताचा आकडा आज होतो की नाही हे सांगता येणार नाही, पण आजच्या परिस्थितीत भाजप सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे यावेळी आपण फक्त वाट पाहण्याच्या भूमिकेत आहोत. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे सह बंडखोर आमदारांविरूद्ध Bombay High Court मध्ये जनहित याचिका दाखल)

दरम्यान, शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वादावर भाजपच्या भूमिकेच्या प्रश्नाला उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, हे सरकार एकमेकांशी भिडणार हे आम्ही आधीचं सांगितलं होतं. आजही तेच घडत आहे. हे लोक आपापसात भांडून पक्षाला खाली आणत आहेत. यात भाजपची कोणतीही भूमिका नाही.

एकनाथ शिंदेंसोबत भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कुणाला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर देताना दानवे म्हणाले की, 'याबाबत निर्णय घेणारा मी नाही. कोण खुर्चीवर बसणार आणि कोण नाही हे मी ठरवणार नाही.'