Pune Porsche Accident Case: लेकासाठी रडली, हात जोडून विनंती केली; अल्पवयीन मुलाच्या आईची मदतीसाठी हाक (Watch Video)
pune porsche accident PC YOUTUBE

Pune Porsche Accident Case: पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळं वळण घेत आहे. त्यात एक रॅप सॉगचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक तरुण रॅप सॉंग गाताना दिसत आहे. ज्यात त्याने शिविगाळ केले आहे आणि रस्ता अपघाताचा उल्लेख केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी व्हिडिओतील मुलगा हाच अल्पवयीन आरोपी असल्याचा दावा केला. पोलिसांनी याचा खुलासा केला आहे. एका इन्स्टाग्रामवरील रॅपने हे सॉग गायल्याचे समोर आले. व्हायरल झालेल्यावर व्हिडिओवर अल्पवयीन आरोपीच्या आईने खुलासा  केला आहे. (हेही वाचा- पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीने Rap Song बनवल्याचा दावा खोटा, व्हिडिओ Cringistaan नावाच्या एका instagram influencer ची असल्याची माहिती)

मिळालेल्या माहितीनुसार, अनेकांनी दावा केला की, मुलाला जामीन मिळाल्यानंतर मुलाने हा रॅप सॉग गायला आहे. यावर पुणे पोलिस आयुक्तांनी खुलासा केला की, हे रॅप सॉग अल्पवयीन मुलाने गायले नाही. त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या आईने याचा खुलासा करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तीनं सांगितले आहे की, तो व्हायरल झालेला रॅप सॉगचा व्हिडिओ माझ्या मुलाचे नाही. तसेच माझ्या मुलाला वाचवा अशी विनंतीही आरोपीच्या आईने केली आहे.

त्यांनी पुढे प्रसारमाध्यमांना सांगितले की, हा व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही. हा व्हिडिओ बनावट आहे. माझा मुलगा डिटेंशन सेंटरमध्ये आहे. मी पोलिस आयुक्तांना विनंती करते की, माझ्या मुलाला संरक्षण द्या.  या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे. युट्यूब आणि इंस्टाग्रामवर ‘क्रिंगिस्टन’ नावाच्या रॅपरने हा व्हिडिओ बनवला आहे.