Latest Marathi News: राज्यात उशीरा दाखल झाला असला तरी पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काही भागांमध्ये मात्र पावसाने दिलेली ओढ कायम (Weather Update Monsoon) आहे. त्यामुळे तिथे पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अशा वेळी मुंबई शहर आणि उपनगरांसह पुण्यामध्ये पाऊस जोरदार सुरु आहे. याशिवाय ठाणे, पालघर, कोकण परिसरातही दमदार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहू शकतो. आयएमडीने आज कोकण परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर कोकण विभागात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळू शकते. (हेही वाचा, Today's Weather Update: महाराष्ट्र मान्सून, आजचे हवामान; काय आहे IMD चा अंदाज)
ठाणे आणि पुण्यातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसू शकतो असे आयएमडीने म्हटले आहे. मुंबईमध्ये मात्र, पावसाचा जोर तुलनेत कमी राहिली. मात्र तो बरसत राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पाच जुलै नंतर पुढचे तीन दिवस मात्र मुंबईत मुसळधार पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावण्याची शक्यता आहे.
दरमान, राज्यातील विविध ठिकाणी पावसाने उगडीप दिली असून पाऊस काहीसा ओसरला आहे. पण ही विश्रांती किती काळ असेल सांगता येत नाही. थोड्याश्या उघडीपीनंतर एकदोन दिवसांमध्ये पाऊस पुन्हा बरसू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे.