Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

Maharashtra Monsoon 2023: राज्यात पाठिमागील आठवड्यात धुवंधार सुरु असलेला पाऊस काहीसा मंदावला आहे. पण तो पूर्ण थांबला नाही. तो अधूनमधून बरसतच आहे. त्यामुळे आजचे हवामान (Today's Weather) आणि महाराष्ट्र मान्सून या आठवड्यात कसा असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस बरण्याची शक्यता आहे. खास करुन पुढचे तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण विभागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आयएमडीने अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

अल निनोचा प्रभाव अद्यापही कायम आहे. परिणामी घाटमाथा सोडला तर उर्वरीत जिल्ह्यांमध्ये पाऊस तुरळक होईल. विदर्भात पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे या ठिकाणीही अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबई वेधशाळेने म्हटले आहे की, गावा आणि पूर्व पछ्चिम विदर्भ, उत्तर दक्षिण कोकण आदी प्रदेशांमध्ये येत्या 5 जुलै पर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर भागांमध्ये हलाका ते मध्यम तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल. (हेही वाचा, Vegetable Price Hike: मुसळधार पावसामुळे खिशाला कात्री! आलं आणि टोमॅटो सोबत ह्या भाज्या देखील विक्रमी किमतीला)

ट्विट

दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि् उद्या मुसळधार पाऊस कोसळू शकते. पावसाचा हा जोर येत्या 5क जुलैला हळूहळू उतरेल असेल हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, इतर भागांमध्ये तुरळक पाऊस सुरुच राहील. तर मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पाच जुलैच्या दरम्यान, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.