Maharashtra Weather Forecast: ठाणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागात दमदार पावसाला सुरुवात
Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Rain Updates: परतीच्या पावसाने राज्यात दमदार हजेरी (Maharashtra Weather Forecast) लावण्यास सुरुवात केली आहे. परतीच्या मान्सूनसाठी आवश्य वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाने राज्यातील विविध भागात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागानेही या पावसाची पूर्वकल्पना आगोदरच दिली होती. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात परतिच्या पावसासाठी पूरक वातावरण असून पुढचे तीन चार दिवस हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असे म्हटले होते. त्यानुसार नवी मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात हलका मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अपवाद फक्त उत्तर मध्य महाराष्ट्रा आणि पूर्व विदर्भचा. उर्वरीत ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाच्या तुरळक काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी पडतील असा अंदाज आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: पुणे, नाशिक, सोलापूरात दमदार पावसाची हजेरी तर उत्तर महाराष्ट्रासह कोकणातही सरी बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज)

ट्विट

दरम्यान, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात परतिच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मधल्या काही कालावधीत पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. त्यामुळे आकाशही निरभ्र होते. त्यामुळे आता पाऊस गेला. तो इतक्यात येणार नाही, असा सर्वांचाच व्होरा होता. पण, सर्वांचेच गणित चुकवत पावसाने दमदार हजेरी लावली.