Uddhav Thackeray। (Photo Credit: Twitter)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेने नुकताच आपला वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यात ब-याच गोष्टींवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. त्यात सर्वात जास्त टीकेचा मुद्दा ठरला तो जनतेला 10 रुपयांत जेवणाची थाळी देण्याचे आश्वासन. या आश्वासनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) जोरदार खिल्ली उडवली होती. त्या टोलेबाजी प्रत्युत्तर देत 'आम्ही वेळ पडल्यास जनतेसाठी स्वयंपाक करु, फक्त 'त्या' धरणातलं पाणी नको' असे बार्शी येथील सभेत बोलताना सांगितले.

शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या वचचनाम्यात पुन्हा सरकार आल्यानंतर 10 रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली होती. शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली हे कळलच नाही आणि आता ते थाळी देणार आहे. तुम्हाला राज्य चालवायचेय की स्वयंपाक करायचा आहे, असा सवाल करत शिवसेनेला टोला लगावला. 12 ऑक्टोबरला बार्शी येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

हेदेखील वाचा- Shiv Sena Manifesto 2019: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा 'वचननामा' जाहीर; सत्तेत आल्यावर देणार 10 रुपयात थाळी, 1 रु. मध्ये आरोग्य तपासणी

त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत आज बार्शी येथे झालेल्या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करु, पण आम्हाला त्या धरणातलं पाणी नको,' असे म्हणत उद्धव यांनी अजित पवारांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. बार्शी येथे दिलीप सोपल या उमेदवाराच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती.

ही निवडणुकीची सभा आहे करमणुकीची सभा नाही, त्यामुळे मी विरोधकांवर टीका करणे टाळतो, असे म्हणत पवारांवर टीका करण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं. एकतर स्वत: काही चांगलं काम करायच नाही आणि चांगलं करतायत त्याला करु द्यायचे नाही, अशी पवारांची नीती आहे. दिलेला शब्द खरा करण्यासाठीच शिवसेनेचा वचननामा असल्याचही त्यांनी या सभेत सांगितले.