यंदाचे वर्ष ही मुंबईकरांसाठी पाण्याबाबतीत अत्यंत दिलासा देणारे होते. यंदा मुंबईत (Mumbai) पडलेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांना पुढील वर्षाभरापर्यंत पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. मात्र काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर पाणीकपातीची घोषणा महापालिकेने केली आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, पालिकेच्या पिसे उदंचन केंद्रामध्ये ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात करण्यात येत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाने कळवले आहे.
या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. मात्र पाणीपुरवठा यंत्रणेतील दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांत अनेकदा पाणीकपात करावी लागली आहे. या वेळी ही पाणीकपात आठवडाभर राहणार असल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
हेदेखील वाचा- मुंबई: BMC चा नवा उपक्रम; मॅनहोलची साफसफाई करण्यासाठी सादर केले रोबोट्स, चेंबूरमध्ये काम सुरु
या पाणीकपातीमुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच डिसेंबर हा महिना प्रामुख्याने लग्नसराईचा असतो. ऐन लग्नसराईत अशी पाणीकपातीची समस्या निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सध्या मेट्रो प्रकल्पानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मॅनहोल (Manhole) म्हणजे नाल्यांची सफाई करण्यासाठी रोबोटिक मशीन (Robotic Machines) उपलब्ध करून दिले आहेत. बुधवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने, कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कार्यक्रमांतर्गत नागरी संस्थेला एम-वेस्ट वॉर्ड (चेंबूर) साठी अशा दोन मशीन दिल्या.