Pune Rain Update: पुण्यात आज संध्याकाळपासून जोरदार पावसाने सुरुवात केली असून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे इंदापूरच्या (Indapur) काही भागात वॉटर लॉगिंगची (Water Logging) समस्या निर्माण झाली असून काही भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा वेधशाळेने अंदाज व्यक्त केला असला तरीही पुणेकर मात्र भीतीच्या छायेत आहे. पुण्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
पुण्यातील या धो-धो कोसळणा-या या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पाषाण, कर्वे नगर या भागातील वीज गायब आहे तर बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज होणारे माझे कुटुंब माझो जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे. तसेच पुणे -सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला आहे. Maharashtra Rain Update: कोल्हापूर, सातारा, लातूर जिल्ह्यांसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा
Pune: Water logging in parts of Indapur following heavy rainfall in the district. #Maharashtra pic.twitter.com/nXAuoQmkrk
— ANI (@ANI) October 14, 2020
पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन-चार तासांपासून या परिसरात पावसाची कोसळधार सुरुच आहे. रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतोय. त्यामुळं पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता जोर घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले आहे.