![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/Maharashtra-Rain-Update-1-380x214.jpg)
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी (Heavy Rains In Maharashtra,) लावली आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढतो आहे की काय असे चित्र आहे. कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली, सोलापूर, लातूर (Latur ) जिल्ह्यांसह राज्यभरात आज (14 ऑक्टोबर) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा द्यावा लागला आहे. मुसळधार पावसाचा तडाखा शेतीला तर बसला आहेच. अनुचित घटनाही घडल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे. प्रामुख्याने कोल्हापूरमधील करवीर तालूक्यातील पश्चिम भाग आणि गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकामी घरांची पडझड झाली. पिके झोपली, तसेच नागरिकांच्या घरांचे पत्रेही उडाले. कोल्हापूर जिल्ह्यात येत्या शनिवार (17 ऑक्टोबर) पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे.
सांगली जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे नुकसान
सांगली जिल्ह्यातही पाऊस नसल्याची नेहमीच ओरड असते. परंतू, यंदा पावसाने या जिल्ह्यावरही इतकी कृपादृष्टी दाखवली आहे की, पाऊस पुरे म्हण्याची वेळ आली आहे. गेले तीन दिवस या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस मुसळदार कोसळत आहे. त्यामुंळे डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. सांगितले जात आहे की, संबंध जिल्ह्यात 500 हेक्टर ऊस, मका 519 हेक्टर,डाळिंब 950 हेक्टर, ज्वारी 90 हेक्टर, भाताचे 30 हेक्टर आदी क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात दमदार पावसाची शक्यता- हवामान विभाग)
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार, पिकरांचे मोठे नुससान
सोलापूर जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतू, या जिल्ह्यात पावसाेन यंदा अशी काही हजेरी लावली आहे की, 'पाऊस.. नोको... रे बाबा..' असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या आठवड्यापासून (10 ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पावसाची संततधार कामय असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. सोबतच पिकांचेही मोठे नुसकसान झाले आहे. आज (14 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर शहरात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी)
दक्षिण कोकण, गोव्यातही धुवांधार..
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकण आणि गोव्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा या पावसाला कारणीभूत आहे. बंगालच्या उपसारगरातून हा पट्टा प्रती तास 17 किमी या वेगाने पुढे सरकत आहे. परिणामी बुधवार, गुरुवार दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्याता हवामान विभागाने या आधीच व्यक्त केली आहे.
लातूर जिल्ह्यात नदी,नाले ओसंडले
लातूर शहरात मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. कालपासून (13 ऑक्टोबर) जिल्ह्यात पाऊस कोसळतच असल्याने नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत कामलिची वाढ झाली आहे. प्रामुख्याने निलंगा, देवणी, जळकोट तालुक्यात पावसाची हजेरी मोठ्या प्रमाणावर जाणवते. मुसळधार पावसामुळे काही काळ परिसरातील विद्युत पुरवठाही खंडीत झाला आहे.
एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसऱ्या बाजूला मुसळधार पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यतील शेतकरी सापडला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. परंतू, सतर्कतेमुळे होणारे नुकसान टळणार नाही. राज्य सरकारने शेतकऱ्याचे नुकसान विचारात घेऊन योग्यत ती मदत करावी अशी भावाना नागरिक व्यक्त करत आहेत.