वर्धा: विज्ञान शाखेत समाधानकारक गुण न मिळाल्याने बारावी बोर्डाच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

वर्धा (Wardha) मधील एका विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीने तिला बारावी बोर्डाच्या परिक्षेत समाधानकारक गुण न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तत्पूर्वी आपली मुलगी पास झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिच्या वडिलांनी घरी पेढे आणले मात्र मुलीने गळफास लावून घेतल्याचे पाहताच त्यांना धक्का बसला. परंतु विद्यार्थिनीच्या घरातील मंडळी ही तिला मिळालेल्या गुणांमुळे आनंदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा भिसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा हिने वर्धा मधील एका कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावी बोर्डाची परिक्षा दिली होती. नुकताच बारावीचा निकाल लागल्याने तिला यामध्ये 55 टक्के गुणांनी ती पास झाली. मात्र पूजा तिला मिळालेल्या या गुणांमुळे नाखुश होती. त्यामुळे तिने घरी संध्याकाळच्या वेळेस गळफास लावत आपले आयुष्य संपवले आहे.(संतापजनक! आजोबांनी केला आपल्या नातीवर बलात्कार, भावाचाही सहभाग; पिडीत मुलगी गर्भवती)

या प्रकारामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कमी गुण मिळाले आत्महत्या करण्यासारखी टोकाची भुमिका घेणे हे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यात विद्यार्थ्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल न उचलावे यासाठी वारंवार त्यांना आवाहन करण्यात येते.