संतापजनक! आजोबांनी केला आपल्या नातीवर बलात्कार, भावाचाही सहभाग; पिडीत मुलगी गर्भवती
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Ahmednagar: आजोबा आणि नात यांच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात 65 वर्षीय आजोबांनी आपल्या 16 वर्षीय नातीवर बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे. या गोष्टीमुळे आता पिडीत मुलगी गर्भवती आहे. आश्चर्य म्हणजे या सर्व प्रकरणात मुलीचा भाऊही सामील होता. हे कृत्य आजोबा आणि मुलीच्या भावाने मिळून केले. या गोष्टीबाबत पारनेर (Parner) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.

पिडीत मुलगी 16 वर्षांची आहे. शेतात काम करत असताना तिच्या आजोबांनी आणि तिच्या भावाने तिच्यावर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. मुलीने नकार दिला असता, तिच्यावर बळजबरी करून अत्याचार करण्यात आला. याबाबत कुठे वाच्चता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या गोष्टीमुळे घाबरून मुलीने कोणालाही काही सांगितले नाही. (हेही वाचा: सातारा: आईवरच केला पोटच्या मुलाने बलात्कार, आरोपीला अटक)

काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागले. तिला उपचारांसाठी रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर पिडीतेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये या दोघांबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनीदेखील त्वरीत कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.