Mumbai: औषध लावण्याच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग; वॉर्डबॉयला अटक
Ward boy arrested for molesting a woman in a Mumbai Hospital (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) एका रुग्णालयातून विनयभंगाची घटना समोर येत आहे. वॉर्डबॉयने (Ward Boy) महिला रुग्णाचा विनयभंग (Molesting) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वार्डबॉय विरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करुन त्याला अटक केली आहे. मुकेश प्रजापती असे या आरोपीचे नाव असून तो 25 वर्षांचा आहे. त्याच्यावर भारतीय दंड कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने औषध लावण्याचा बहाण्याने महिलेच्या प्रायव्हेट भागाला स्पर्श केला. या प्रकरणी आम्ही एफआयर दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतलं. (Pune: शिरूरमध्ये 37 वर्षीय महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे निकामी करणाऱ्या आरोपीला अटक)

मालाड पूर्वेकडील एका हॉस्पिटलमध्ये 16 डिसेंबर रोजी शस्त्रक्रियेसाठी एक 29 वर्षीय महिलेला दाखल झाली. 17 डिसेंबरच्या रात्री रुग्ण महिलेच्या शरीरावर औषध लावत असताना वॉर्ड बॉयने खाजगी जागेला स्पर्श केला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिने हा सर्व प्रसंग तिच्या कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत रात्रीच्या वेळेस महिलेच्या रुममध्ये जाण्याची परवानगी वॉर्ड बॉयला कशी देण्यात आली, असा सवालही  उपस्थित केला. (Girl Harassed on Mumbai Local Train: धक्कादायक! तरुणीचा विनयभंग करून धावत्या लोकलमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न; एकाला अटक)

ANI Tweet:

यापूर्वी वसईतील एका कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. आरोपीने पीडितेचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून 10 लाखांची मागणी केली होती. ट्रेन,  रस्ते अगदी हॉस्पिटलमध्येही विनयभंग, बलात्कार यांसारख्या घटना घडत आहेत. या अनेक घटनांवरुन महिला सुरक्षेचा प्रश्न सर्वत्र असल्याचे दिसून येते.