मध्य रेल्वेच्या सोलापूर (Solapur) विभागातील तिलाटी रेल्वेस्थानकांदरम्यान 17 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत मेगा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे वाडी-सोलापूर, रायचूर-विजयपूर आणि कलबुर्गी-सोलापूर या तीन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, अन्य गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
सोलापूरातील तिलाटी रेल्वेस्टेशनवर नॉनइंटरलॉकिंग कामाकरिता 17 ते 20 ऑक्टोबर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. गाडी क्रमांक 57134 रायचूर-विजयपूर ही गाडी कलबुर्गी स्थानकापर्यंत धावणार आहे. त्यानंतर हीच गाडी कलबुर्गी स्थानकावरुन गाडी क्रमांक 57133 विजयपूर-रायचूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
तसेच गाडी क्रमांक 57133 विजयपूर-रायचूर पॅसेंजर सोलापूर स्थानकापर्यंत धावेल. गाडी क्रमांक 57628 कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. तर प्रवाशांनी गाड्यामधेय परिवर्तन झाल्याची नोंद घ्याली आणि प्रवास सुनिश्चित करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
त्याचबरोबर गाडी क्रमांक 57659 सोलापूर-फलकनामा ही पॅसेंजर सोलापूर स्थानक आणि कलबुर्गी या स्थानकादरम्यान धावणार नाही. तसेच गाडी क्रमांक 71301 सोलापूर-कलबुर्गी स्थानकांदरम्यान धावणार नाही असेही सांगण्यात आले आहे.