आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर एका महिलेला तिकीट मिळवून देण्याच्या आमिषावर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप मनसेच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील विभाग अध्यक्ष वृशांत वडके (Vrushant Wadke) यांच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणी वृशांत वडके यांना अटक देखील करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीवर एफआयआर नोंदवण्यात आली असल्याची VP Road Police यांनी दिली आहे.
42 वर्षीय महिलेवर तिकीट मिळवून देण्याच्या आमिषाखाली वृशांत वडके ने सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 दरम्यान बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वडके यांनी 7 सप्टेंबर 2022 दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या वैयक्तिक कारणास्तव विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र दिल्याचंही समोर आलं आहे. हे देखील नक्की वाचा: MNS On Meat: मनसे लवकरच हलाल मांसाविरोधात मोहीम करणार सुरू, मीटमधून मिळणाऱ्या कमाईचा वापर टेरर फंडिंगसाठी झाल्याचा केला आरोप .
Maharashtra | Vrushant Wadke, a member of MNS, arrested for allegedly raping a 42-year-old woman between Sept 2021 to July 2022 on the pretext of giving her a party ticket in upcoming BMC elections. FIR registered on the basis of woman's complaint to VP Road Police: Mumbai Police
— ANI (@ANI) September 13, 2022
मुंबई महानगरपालिकेचा कालावधी संपला असल्याने आता नव्याने निवडणूका प्रस्तावित आहेत. सध्या बीएमसीचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपावण्यात आला आहे. कालच मंत्रीमंडळ बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.