Cash-for-votes Allegations: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल (Maharashtra Assembly Results) 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मात्र त्याआधी पैसे वाटपाच्या आरोपांना सामोरे जाणारे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सुप्रिया श्रीनेट (Supriya Shrinate) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत या तिन्ही नेत्यांनी विनोद तावडे यांची बिनशर्त माफी मागावी, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
याशिवाय, तीन इंग्रजी वृत्तपत्रे आणि तीन प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर माफीनामा प्रसिद्ध करा. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माफीनामा पोस्ट करा. माफी न मागितल्यास तिन्ही नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि 100 कोटी रुपयांचा दिवाणी खटलाही दाखल करण्यात येईल, असा इशाराही विनोद तावडे यांच्याकडून देण्यात आला आहे. (हेही वाचा -Vinod Tawde Cash For Votes In Virar: विरारमध्ये राडा; विनोद तावडे यांना पैसे वाटताना घेरले; दोन डायऱ्याही सापडल्या; बविआ कार्यकर्त्यांकडून रंगेहात पकडल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल)
यासंदर्भात बोलताना विनोद तावडे यांनी म्हटलं आहे की, 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया यांनी विनोद तावडे यांना मतदारांना 5 कोटी रुपये वाटताना रंगेहात पकडले आणि अशी नाट्यमय विधाने केली. त्यांना फक्त माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करायची होती, मी गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी असे काहीही केले नाही. काँग्रेस नेत्यांना माझी, पक्षाची आणि माझ्या नेत्यांची बदनामी करायची होती. त्यामुळे त्यांनी हे खोटे मीडिया आणि लोकांसमोर जाणूनबुजून सांगितले. म्हणून मी त्यांना याप्रकरणी जाहीर माफी मागावी किंवा न्यायालयीन कारवाईला तोंड द्यावे, असा इशाराही विनोद तावडे यांनी दिला आहे. (हेही वाचा - Maharashtra Assembly Elections 2024: पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजप नेते विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण; EC ने दाखल केला एफआयआर (Video))
विनोद तावडेंकडून मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना नोटीस -
#WATCH | Delhi: BJP National General Secretary Vinod Tawde says, " On the eve of Maharashtra Assembly elections, 19th November, Congress chief Mallikarjun Kharge, Congress leader Rahul Gandhi and party spokesperson Supriya said that Vinod Tawde was caught red-handed with Rs 5… pic.twitter.com/9YltGsPr8f
— ANI (@ANI) November 22, 2024
काँग्रेसचं काम फक्त खोटं पसरवणं आहे - विनोद तावडे
कांग्रेस का एक ही काम है झूठ फैलाना!
नालासोपारा वाले झूठे मामले में मैंने कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, राहुल गाँधी और पार्टी प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत को मानहानि का नोटिस भेजा है, क्योंकि उन्होंने इस मामले में झूठ फैलाकर मेरी और भारतीय जनता पार्टी की छवि को नुकसान… pic.twitter.com/ZO75yKSx8m
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 22, 2024
विनोद तावडे यांनी काँग्रेस नेत्यांना बजावलेल्या नोटिसीच्या प्रती शेअर करताना एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'काँग्रेसचे काम फक्त खोटे पसरवणे आहे! खोट्या नालासोपारा प्रकरणात मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे, कारण त्यांनी या प्रकरणात खोटेपणा पसरवून माझी आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा खराब केली आहे.'