Lok Sabha Election Results 2019: रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत 16 हजार 924 मतांनी आघाडीवर
vinayak raut and nilesh rane (Photo credits: File Photo)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 मतमोजणीची पहिली फेरी पार होऊन पुढील फे-या सुरु झाल्या आहेत. मतमोजणीच्या पहिल्या 2 फेरीतच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना उमेदवार विनायक राऊतांनी(Vinayak Raut) जोरदार मुसंडी मारली आहे. हाती आलेल्या कल नुसार विनायक राऊतांनी महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेच्या निलेश राणेंना (Nilesh Rane) 16,924 मतांनी मागे टाकले आहे. ह्या मतमोजणीचा हा कल निलेश राणेंचा 'कल' असेल हे ठरवणार आहे. ह्या धक्कादायक कलामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणेंची कोकणातील प्रतिष्ठेला धक्का बसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Lok Sabha Election Results 2019: निलेश राणे, शिवसेनेचे अनंत गिते पिछाडीवर; विनायक राऊत, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आघाडीवर; पाहा महाराष्ट्रातून कोकण विभागातील मतमोजणी कल

मागील लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी 1.5 लाख मतांनी निलेश राणेंचा घसघशीत पराभव केला होता. ह्या पराभवाने निलेश राणेंना जोराचा झटकाच बसला. हा निकाल जितका निलेश राणेंसाठी अनपेक्षित होता तितकाच तो महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेसाठी. तेव्हापासून त्या पराभव विजय मिळवणे हाच एकच ध्यास लागलेल्या निलेश राणे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उडी मारली. मात्र त्यातही त्यांच्या मागची विघ्न काही संपत नव्हती. लोकसभा निवडणूक 2019 चा तिसरा टप्पा अगदी 2 दिवसांवर आला असता, महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेच्या 18 पदाधिका-यांनी राजीनामा देऊन विनायक राऊत यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्यामागे थोडी का होईना पण पराभवाची भीती किंबहुना पराभवाची टांगती तलवार कायम मागे राहिल असेच म्हणावे लागेल.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: विनायक राऊत विरुद्ध निलेश राणेंमध्ये चुरशीची लढत

तर दुसरीकडे 2014 लोकसभा निवडणूकीत 1.5 लाख मतांनी निलेश राणेंना पराभूत केलेले शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यंदा पुन्हा निलेश राणेंना टक्कर देण्यासाठी तयार आहेत. जर काँग्रेसचा उमेदवार लढतीत नसता आणि राणे विरुद्ध राऊत अशी थेट लढत झाली असती तर विनायक राऊत यांना ही निवडणूक अजूनच जड झाली असती, अशी शक्यताही अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसेच राऊतांवर नाराज असलेल्या भाजपातील काही कार्यकर्त्यांची मते स्वाभिमानकडे वळल्याचेही कानावर येत आहे.

एकूणच परिस्थिती पाहता कोकणवासियांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे लवकरच कळेल.