Vinayak Mete Accidental Death: विनायक मेटे यांच्या अपघाताप्रकरणी पत्नी ज्योती मेटे यांची चौकशीची मागणी

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचे काल कार अपघाती निधन (Accidental Death) झालं आहे. मेटे यांचा असा अकास्मात मृत्यू सगळ्याच्या मनाला चटका लावून गेला आहे. या अपघातानंतर (Accident) विनायक मेटेंचा जागीच मृत्यू झाला असला तरी त्यांचा बॉडीगार्ड (Body Guard) देखील गंभीर जखमी आहे. या अपघातात मेटे यांच्या गाडीचे ड्रायव्हर एकनाथ कदम (Car driver Eknath Kadam) बचावले आहेत. ड्रायव्हरला पोलिसांनी (Police) ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. तरी आज विनायक मेटे यांच्या कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रीया आली आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.

 

विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाताप्रकरणी पत्नी ज्योती मेटे यांची चौकशीची मागणी केली आहे. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर दोन तासांत काय घडलं? याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर हा अपघात आहे की घातपात याचा तपास करण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या तपासासाठी पोलिसांना कसून चौकशीचे निर्देश दिले आहेत.  तरी आज दुपारी साडे तीन वाजता विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये (Beed) अंत्यसंकार होणार आहेत. (हे ही वाचा:- Ajit Pawar On PM Modi: पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर)

 

विनायक मेटे तातडीने मुंबईत येण्याचं कारण काय आणि मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीस विनायक मेटे यांना कोणी बोलावल असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार (Shiv Sena MP) अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी विनायक मेटे यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली होती. तरी संबंधीत .प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. संबंधीत घटनांचा घटना क्रम लक्षात घेता लवकरच सविस्तर माहिती पुढे येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.