स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज लाल किल्यावरुन (Red Fort) देशातील जनतेशी विशेष संवाद साधला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर (Nepotism) विशेष निशाणा साधला.भ्रष्टाचार (Corruption) आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे, असं विधान पंतप्रधान यांनी केलं आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (Flag Hosting) पार पडला. यावेळी देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी निर्धार केला आहे. तसेच आपल्या अनेक संस्था या घराणेशाहीमुळे प्रभावित आहे. भाऊ- भाच्याचे राजकारण (Politics) सुरू आहे. आपल्याला त्याविरोधात लढावे लागणार आहे. आपल्याला आपल्या संस्था आणखी ताकदवर कराव्या लागणार आहे, आपली योग्यता ओळखून पुढे जाण्यासाठी घराणेशाहीविरोधात जागरूकता दाखवावी लागणार आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याला महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई (Mumbai) राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. लोकशाहीत (Democracy) घराणेशाही आणू नये, भ्रष्टाचारांचं समर्थन कुणीही करू नये. पण बहुमतांनी अस्तित्वात आणलेले सरकार असेल, जनतेनं निवडून दिलेल सरकार असेल तर घराणेशाही कशी? असा सवाल विचारत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घरोणेशाही बाबतच्या वक्तव्याला प्रत्त्युत्तर दिलं आहे.(हे ही वाचा:-Independence Day 2022: राज्याला गतिमान करण्यासाठी सरकार दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा आठवण करुन दिली. जर कुणाच काम चांगल असेल तर आजपर्यंत आपण पाहिलं लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकिर्द पाहिली. त्यानंतर इंदिरा गांधी यांची कारकिर्द पाहिली, एक पोलादी स्त्री म्हणून त्या लोकप्रिय आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये आपण राजीव गांधी याचीही कारकिर्द पाहिली.कॉम्प्युटरच युग हे खऱ्या अर्थांनी त्यांनी आणलं. याप्रकारे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी गांधी घराण्याला पाठींबा दर्शवत पंतप्रधान मोंदींना प्रत्युत्तर दिलं आहे.