Vinay Dubey | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे मुंबई, महाराष्ट्र आणि देशभर लॉकडाऊन (Lockdown) असताना अचाकन वांद्रे परिसरात गर्दी जमवून गोंधळ उडवून दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विनय दुबे (Vinay Dubey) याला आज (15 एप्रिल 2020) स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. विनय दुबे हा उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष आहे. त्याने फेसबुक लाईव्ह आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कामगारांना एकत्र येण्यासाठी चिथावणी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्याने केलेल्या फेसबुक लाईव्हचा व्हिडिओही पोलिसांना मिळाला आहे.

मुंबई पोलिसांनी विनय दुबे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 117, 153 A, 188, 269, 270, 505 (2) आणि 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना एकत्र करुन साथिचे रोग पसरविण्यास कारण ठरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आज त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.Bandra Incident: मुंबईच्या बांद्रा येथे कामगारांना भडकावून एकत्र घेऊन येणाऱ्या 'विनय दुबे'ला अटक; सोशल मिडीयावर लिहिली होती चिथावणीखोर पोस्ट

एएनआय ट्विट

देशात आणि मुंबईसह राज्यभरात सुरु असलेला लॉकडाऊन शांततेत सुरु होता. गर्दी टाळण्यावर पोलीस यश मिळवत होते. मात्र, असे असताना वांद्रे रेल्वे स्टेशन समोर अचानक हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला. अचानक येवढे लोक घराबाहेर येऊन जमलेच कसे? याबाबत सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त होत होते. अखेर घटनेचा तपास करत करत मुंबई पोलीस हे विनय दुबे याच्यापर्यंत पोहोचले.