Vidhan Sabha Election 2019: मतदारांना एका क्लिकवर मिळणार तुमचे मतदान केंद्र आणि मतदार यादीतील तुमची सविस्तर माहिती
Voting | Image used for representational purpose | (Photo credits: PTI)

निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे मतदारराजाची आपल्या मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी किंवा ते आहे की नाही हे पाहण्यासाठी तारांबळ उडते. यावेळी नेमकी अचूक माहिती कुठून आणि कशी मिळेल या विचारात मतदारराजा असतो. अशा वेळी मतदाराने गोंधळून न जाता त्यांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने एक विशेष ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. ज्यात https://electoralsearch.in या संकेतस्थळावर मतदाराला तुमची मतदान केंद्रापासून मतदानसंबंधीची तुमची महत्वाची माहिती प्राप्त होईल.

अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते.नेमका मतदानादिवशी मतदारयादीतील क्रमांक शोधण्यात वेळ जातो. त्यामुळे मतदान स्लिप मिळण्यास विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी ऑनलाईन मतदार माहिती मिळविण्याची सुविधा दिली आहे. ज्यात तुम्हाला मतदानासंबंधी सविस्तर माहिती प्राप्त होईल. हेही वाचा-

Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स

कसे शोधाल नाव:

https://electoralsearch.in या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला तेथे राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (National Voter's Service Portal)हे पेज दिसेल. तिथे तुम्ही तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरल्यास तुम्हाला मतदानासंबंधी संपुर्ण माहिती मिळेल. यात तुम्हाला तुमचे पुर्ण नाव, वडिल/पतीचे नाव, वय, जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ याची माहिती भरावी लागेल. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

सध्याच्या विधानसभा निवडणूकीचे औचित्य साधून त्यावर मतदानाची तारीखही छापण्यात आली आहे. ही माहिती फक्त मतदारांच्या सोयीसाठी असून ती ओळखपत्र म्हणून वापरता येणार नसल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.