
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha) तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र राजकिय नेते मंडळी निवडणुकीसाठी आतापासून तयारी करणाच्या पाठी लागले आहेत. तसेच काही नेत्यांचे राजकिय पक्षांतर सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर बार्शी (Barshi) मतदार संघातील राष्ट्रवादीचे (NCP) आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) हे शिवसेना (Shiv Sena) पक्षात जाण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे जर सोपल शिवसेनेत गेले तर राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे.
बार्शी येथे निवडणुकीसाठी उमेदवार प्रक्रियेच्या मुलाखतीवेळी सोपाल हे उपस्थित राहिले नाहीत. तसेच एका मेळाव्याचे आयोजन करुन सोपाल पुढील आठ दिवसांत भुमिका स्पष्ट करणार आहेत. तसेच इगतपुरी मतदार संघातील काँग्रेस आमदार निर्मला गावित सुद्धा शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरु आहे. निर्मला गावित यांनी एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश करण्यासाठी निमंत्रण दिले असल्याचे बोलले जात आहे. मात्र गावित यांनी शिवसेना प्रवेशाबद्दल त्यांचे मत मांडलेले नाही. परंतु याबाबत लवकरच निर्णय घेऊ अशी भुमिका गावित यांनी घेतली आहे.(नाशिक: आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार? युतीच्या वाटेवर दोन बडे नेते जाण्याची शक्यता)
भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपानुसार बार्शी मतदारसंघ हा शिवसेनेचा येतो. याच कारणास्तव सोपाल शिवबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले यांनी घड्याळाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर महाले यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणखी एक मोहरा सत्ताधारी पक्षाच्या गळाला लागला आहे.