
आगामी विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha) लवकरच राज्यात पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तरीही राजकीय पक्षांमध्ये आतापासून विधानसभेसाठी जोरदार तयारी करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांर्तराच्या गोष्टी सुद्धा पाहायला मिळाल्यात. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीपूर्वी नाशिक(Nashik) मध्ये राष्ट्रवादी (NCP)-काँग्रेसला (Congress) धक्का बसणार आहे. कारण या पक्षांतीले दोन बेडे नेते युतीच्या मार्गावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इगतपुरी येथील खासदार निर्मला गावित (Nirmala Gavit) या शिवसेना पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर निर्मला या काँग्रेस मधील नेते आणि माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. यामुळे जर निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.
तसेच नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एक माजी आमदार भाजप पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपू्र्वी राष्ट्रवादी-काँग्रेसला या दोन बड्या नेत्यांनी जर युतीमध्ये प्रवेश केल्यास तर दुहेरी धक्का बसू शकतो.(राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार धनराज महाले शिवबंधनात अडकले, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश)
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले यांनी घड्याळाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर महाले यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणखी एक मोहरा सत्ताधारी पक्षाच्या गळाला लागला आहे.